पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल अन् बारावी पास आहात तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सातारा जिल्हा परिषदेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेत डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सातारा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सातारा.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, एमएस-/सीआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,650/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18-35 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.zpsatara.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.