पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर आता तुमचा शोध संपण्याची शक्यता आहे. कारण, सांगलीतील महिला व बाल विकास विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सांगलीतील महिला व बाल विकास विभागात अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 28 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sangli.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
– एकूण रिक्त पदे : 28 पदे.
– नोकरीचे ठिकाण : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र.
– शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी- कमाल ४० वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा एकत्रित रु. 5500/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन .
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, आटपाडी. जिल्हा सांगली.