पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला पनवेल येथे सुरु असलेल्या भरती प्रक्रियेबाबत माहिती देणार आहोत. पनवेल महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, ENT विशेषज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पनवेल येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 22 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 असणार आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असला तरी उमेदवारांनी आपला अर्ज पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल-410 206 या पत्त्यावर पाठवावा.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.panvelcorporation.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.