पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता यवतमाळच्या श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक, कक्षसेवक, सफाईगार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला यवतमाळ येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 70 रिक्त पदे भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपीक, कक्षसेवक, सफाईगार.
– एकूण रिक्त पदे : 70 पदे.
– नोकरीचे ठिकाण : यवतमाळ.
– शैक्षणिक पात्रता : बारावी पास, B.P.M.T, कोणत्याही शाखेची पदवी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकाश, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र यवतमाळ / जिल्हा माहीती अधिकारी, यवतमाळ.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.vngmcytl.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.