पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका नोकरीची माहिती देणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अधिवक्ता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या सर्व पदांसाठी 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ अधिवक्ता.
– एकूण रिक्त पदे : 25 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कायदा अधिकारी, विधी विभाग, 3रा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.