पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी / 01 वर्ष TMC फेलोशिप आणि HBNI फेलोशिप या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी / 01 वर्ष TMC फेलोशिप आणि HBNI फेलोशिप.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 59,690/- ते रु.1,32,000/- पर्यंत (पोस्टनुसार).
– वयोमर्यादा : 40 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2024.
– या भरती प्रक्रियेंतर्गत अधिक माहितीसाठी https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.