पुणे : तुमचादेखील नोकरीचा प्रयत्न सुरु असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर येथे बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन (औषध), स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 54 रिक्त पद भरले जाणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असला तरी यासाठी दर सोमवारी मुलाखत घेतली जाणार आहे. स्थायी सभागृह, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत येथे ही मुलाखत होणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.