पुणे : नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, ‘एअर फोर्स स्कूल’, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
पुण्यातील एअर फोर्स स्कूल येथे कार्यालय अधीक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कार्यालय अधीक्षक.
– नोकरी ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, संगणकाचे मूलभूत ज्ञान.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 42,500/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 25-50 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : recruitmentatafsvn@gmail.com
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.airforceschoolpune.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.