पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO मध्ये विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये सात रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला 37 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत ज्युनियर रिसर्च फेलो या पदावर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 28 वर्षापर्यंत वय असणारा उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
- पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो.
- एकूण रिक्त पदे : 07 पदे.
- शैक्षणिक पात्रता : B.E./ B.Tech./ M.E. / M.Tech.
- वयोमर्यादा : 28 वर्षे.
- वेतन / मानधन : दरमहा 37,000/- रुपये.
- निवड प्रक्रिया : मुलाखत.
- मुलाखतीची तारीख : 30 नोव्हेंबर 2023.
- नोकरीचे ठिकाण : पुणे.
- मुलाखतीची पत्ता : रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (इंजिनियर्स) आळंदी रोड, कळस, पुणे- ४११०१५.
- या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.