पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांची इच्छा असते. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. मात्र, आता ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्था’ अर्थात ICMR येथे रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्था’ येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 28 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. मुलाखतीची तारीख 10 ऑक्टोबर ही असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 28000/- (+) HRA मान्य
– निवड प्रक्रिया : मुलाखत / लेखी चाचणी.
– मुलाखत / लेखी चाचणीची तारीख : 10 ऑक्टोबर 2024.
– मुलाखत / लेखी चाचणीची पत्ता : सामाजिक कार्य विभाग, मिझोरम विद्यापीठ, तान्हरिल-796004, आयझॉल, मिझोरम..
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://main.icmr.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.