मुंबई : पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असून राज्यातील विविध वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्या म्हणजेच बुधवार (ता. ९) नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. आता सुमारे १८ हजार ३३१ पदांवरील पोलीस भरती सुरू आहे. अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे.
तसेच, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहे. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात देखील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार यावेळी करण्यात आला असून या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे कोरोना काळामुळे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना देखील संधी मिळणार आहे.
भरती अर्जासाठी पात्रता :
पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या : २१,७६४ जागा
शैक्षणिक पात्रता : बारावी पास (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
खुला वर्ग : १८ ते २८ वर्षे
मागासवर्गीय : १८ ते ३३ वर्षे
खुला प्रवर्ग: रु. ४५० /-
मागास प्रवर्ग: रु. ३५० /-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ९ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in