पुणे : पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून आता 113पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामधील 13 पदे माजी सैनिक अनुशेष भरून काढण्यासाठी राखीव ठेवली आहेत. सर्व संवर्गासाठी 100 पदे असणार आहेत. पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर 16 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
कनिष्ठ अभियंतासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट ठेवली होती. गेल्या काही दिवसांपासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार पुणे महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवली आहे. आता पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल.