पुणे : लातूरच्या जिल्हा परिषदेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 3 मार्च, 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लातूरच्या जिल्हा परिषदेत मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस) यांसह अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस).
– नोकरीचे ठिकाण : लातूर.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 03 मार्च 2025.
– मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zplatur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.