पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, मुंबई येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, मुंबई येथे अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत भागीदारी व्यवस्थापक आणि वरिष्ठ कम्युनिकेशन असोसिएट या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 31 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : भागीदारी व्यवस्थापक आणि वरिष्ठ कम्युनिकेशन असोसिएट.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई
– वेतन / मानधन : दरमहा रु. 45,000/- ते रु. 70,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 17 मे 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.tiss.edu/वरून माहिती घेता येणार आहे.