पुणे : रेल्वे बोर्डामार्फत पॅरा-मेडिकल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी १६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. अर्ज रेल्वे भरती बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्काच्या भरणासह अर्जातील दुरुस्त्या १७ ते २६ सप्टेंबरपर्यंत करता येतील.
यामध्ये ‘खाते तयार करा’ या अर्जात भरलेले तपशील आणि ‘रेल्वे भर्ती मंडळ निवडले’ या तपशिलात बदल करता येणार नाही. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तपशीलवार केंद्रीकृत रोजगार सूचना क्र. ०४/२०२४ पाहावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (नि.) यांनी कळविले आहे.