पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पुण्यातील ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ येथे प्रोजेक्ट असोसिएट-I या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट-I.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 31,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
http://www.ncl-india.org/ वरून माहिती घेता येणार आहे.