पुणे : नागपुरातील जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 90 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
नागपुरातील जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालयात अतिथी व्याख्याता, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एआरटी डेटा व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ आणि समुपदेशक, अधीक्षक (महिला) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असला तरी यासाठी 16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अतिथी व्याख्याता, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एआरटी डेटा व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ आणि समुपदेशक
– एकूण रिक्त पदे : 08 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, एमएमसी/एनएमसी सह एमबीबीएस, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, बीएमएलटी/बीएमएलएस.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 21,000/- ते रु.90,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 60 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर).
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://nagpur.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.