पुणे : चांगली नोकरी मिळावी असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, आता नागपुरातील ‘विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नागपुरातील ‘विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये प्रशिक्षण आणि प्लेसमेंट व्यवस्थापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 65 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशिक्षण आणि प्लेसमेंट व्यवस्थापक.
– एकूण रिक्त पदे : 1 पद.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी. टेक. किंवा एम.बी.ए.
– वेतन / मानधन : दरमहा 65,000 हजार रुपयांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मे 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://vnit.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.