पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मालेगाव महानगरपालिकेत येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सदर भरती ही कंत्राटी स्वरुपात केली जाणार आहे.

मालेगाव महानगरपालिकेत पीएचएम (सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक), सीक्यूएसी (शहर गुणवत्ता समन्वयक), मायक्रोबायोलॉजिस्ट, एएनएम या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मालेगाव, नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://malegaoncorporation.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पीएचएम (सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक), सीक्यूएसी (शहर गुणवत्ता समन्वयक), मायक्रोबायोलॉजिस्ट, एएनएम.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मालेगाव, नाशिक.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस / बीएएमएस / बीएचएमएस / बीयूएमएस / बीडीएस, एमबीबीएस आणि एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट, एएनएम.
– वेतन / मानधन : दरमहा 18000 ते 75000 रुपयांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 25 फेब्रुवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मार्च 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.







