Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांची भूमिका काय? ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर येताच जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 November 2026, 20:43

मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन ही घटनात्मक प्रक्रिया असून ती करावीच लागते, त्याला पर्याय नाही. मतदारसंघ पुनर्रचना गरजेची असते, असे शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान आपल्याला सांगितले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आव्हाड यांनी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत आपली भूमिका मांडली.

आव्हाड म्हणाले, “मतदारसंघ पुनर्रचना गरजेची असते, असे पवारसाहेब मला अनौपचारिक चर्चेत म्हणाले होते. डिलिमिटेशन ही घटनात्मक प्रक्रिया आहे. ती करावीच लागते, त्याला काही पर्याय नसतो, असेही साहेबांनी मला सांगितले होते.”

पवारसाहेब माझे दैवत आहेत. त्यांची जी भूमिका आहे, तीच माझी भूमिका असेल, असेही आव्हाड यांनी सांगितले. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आठ खासदारांना सोबत घेऊन सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील, तो अंतिम असेल, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता आव्हाड यांनी आपल्या शरद पवार यांच्यासोबतच्या जुन्या संबंधांचा उल्लेख केला. “१९८६ पासून मी शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे निष्ठा काय असते, हे मला माहिती आहे. मी त्यांना दैवत मानतो. त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल,” असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांना उद्या किंवा परवा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहितीही जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांची भूमिका काय? ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर येताच जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा!

Friday, 27 November 2026, 20:43

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

Friday, 27 November 2026, 19:54

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Friday, 27 November 2026, 19:03

मुंबईत कबुतरांवरून तुफान राडा! एकट्या महिलेने चौघांना तुडवलं; नेमकं काय घडलं?

Friday, 27 November 2026, 19:01

“पोलीस असल्याचे सांगितले अन् दाम्पत्याला लुटले! सरदवाडीत ५२ हजारांची हातचलाखी”

Friday, 27 November 2026, 18:14

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp