Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 November 2026, 19:54

पुणे : वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत संपल्यानंतरही ज्यांनी नंबर प्लेट बसविलेली नाही, अशा वाहनधारकांना आता विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, पत्ता बदल, परवाना नूतनीकरण तसेच वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे यांसारख्या कामांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व वाहनांना ३० जून २०२६ पर्यंत HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० नुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांनाही HSRP नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या वाहनांना अद्याप ही नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही, अशा वाहनांसाठी वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, परवाना नूतनीकरण आणि कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे यांसारख्या कामांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहनाची पुनर्नोंदणी आणि वाहनात बदल करण्यासंबंधीची कामेही करता येणार नाहीत. मात्र, योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

जुन्या नंबर प्लेटवरून वाहनांची ओळख पटविणे अनेकदा कठीण जाते. त्यामुळे वाहनचोरी, अपघात आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्लेटवर वाहनाचा नोंदणी क्रमांक, राज्याचा कोड आणि सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये असतात.

HSRP प्लेट सहजपणे तुटत नाही किंवा काढता येत नाही. तसेच तिच्यात फेरफार करणेही शक्य नसल्याने वाहनांची ओळख पटविणे अधिक सोपे होते. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करून आपल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनधारकांसह ऑटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक आणि बस संघटनांनी तसेच वाहन वितरकांनीही या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे. जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

Friday, 27 November 2026, 19:54

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Friday, 27 November 2026, 19:03

मुंबईत कबुतरांवरून तुफान राडा! एकट्या महिलेने चौघांना तुडवलं; नेमकं काय घडलं?

Friday, 27 November 2026, 19:01

“पोलीस असल्याचे सांगितले अन् दाम्पत्याला लुटले! सरदवाडीत ५२ हजारांची हातचलाखी”

Friday, 27 November 2026, 18:14

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp