Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पोलीस असल्याचे सांगितले अन् दाम्पत्याला लुटले! सरदवाडीत ५२ हजारांची हातचलाखी”

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 27 November 2026, 18:14

शिरूर: पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. रस्त्यात अडवून दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवण्याचा बहाणा करत दोन भामट्यांनी एका दाम्पत्याला तब्बल ५२ हजार रुपयांचा गंडा घातला. अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सरदवाडी (ता.शिरूर) गावच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर (जि.पुणे) येथील शांतीनगर परिसरात राहणारे मच्छिंद्र शेंडगे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी शेंडगे (वय ४०) हे मंगळवारी(ता.२४) दुचाकीवरून चंदननगर (पुणे) येथे जात होते. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ते सरदवाडी येथील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आले असता, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले आणि पुढे पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याचे सांगत, आम्हीही पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर दाम्पत्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ते बॅगेत सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला. संबंधित आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दाम्पत्याने अंगावरील दागिने आणि रोख रक्कम त्यांच्या हवाली केली.

मात्र, सुरक्षिततेचा बहाणा करणाऱ्या या भामट्यांनी हातचलाखीने तब्बल ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सात हजार रुपये रोख, असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर दोघांनी पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून पळ काढला. याप्रसंगी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अश्विनी शेंडगे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांच्याविरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांनो, सावधान! तोतया पोलिसांच्या आमिषाला बळी पडू नका!

पोलीस असल्याचे सांगून रस्त्यात अडवणे, दागिने किंवा पैसे सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने ते ताब्यात घेणे, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती पोलीस असल्याचे सांगत दागिने अथवा रोख रक्कम ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्यास तिची अधिकृत ओळख तपासावी. संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

भरदिवसा महामार्गावरच नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक होत असेल, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. या भामट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्याचे आव्हान आता शिरूर पोलिसांसमोर आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“पोलीस असल्याचे सांगितले अन् दाम्पत्याला लुटले! सरदवाडीत ५२ हजारांची हातचलाखी”

Friday, 27 November 2026, 18:14

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16

वाघोलीसह पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा! आमदार माऊली आबा कटके यांची पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

Friday, 27 November 2026, 16:14
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp