Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी सर्वात मोठी खुशखबर! डिसेंबरअखेर केंद्र सरकार करणार मोठी घोषणा; पेन्शन अन् आरोग्य विम्याचा थेट लाभ!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 November 2026, 22:57

मुंबई: देशातील गिग आणि प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी केंद्र सरकार सामाजिक सुरक्षा सुविधा लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबरअखेर या कामगारांसाठी पेन्शन, आरोग्य विमा, मातृत्व लाभ आणि अपंगत्व संरक्षण यांसारख्या सुविधा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. प्रस्तावित योजनांचा देशातील जवळपास १५ लाख गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना फायदा होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना या योजनांचे प्राथमिक लाभार्थी मानले जाण्याची शक्यता आहे. प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या माध्यमातून या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांनाही पेन्शनसह इतर सामाजिक सुरक्षा सुविधांचा लाभ मिळू शकतो.

या माध्यमातून अधिकाधिक गिग वर्कर्सना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामाजिक सुरक्षा योजनांसाठी निधी उभारण्याकरिता प्लॅटफॉर्म कंपन्यांकडून आर्थिक योगदान घेण्याचे पर्याय विचाराधीन आहेत. यासाठी दोन मॉडेलवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पहिल्या मॉडेलनुसार, कंपन्यांना त्यांच्या एकूण उलाढालीच्या (Turnover) जवळपास दोन टक्के रक्कम सामाजिक सुरक्षा निधीत जमा करावी लागू शकते. दुसऱ्या पर्यायात प्रत्येक व्यवहाराच्या मूल्याच्या सुमारे दोन टक्के योगदान देण्याची तरतूद असू शकते. मात्र, या दोन्ही पर्यायांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

स्विगी, झोमॅटो, उबर, ओला, रॅपिडो, प्रोंटो, स्नॅबिट आणि अर्बन कंपनी यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मशी संबंधित कामगारांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. या कंपन्यांनी आपल्या कामगारांची माहिती सरकारसोबत शेअर केल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे.

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाच्या (NSSB) आगामी बैठकीत कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या योगदानाच्या मॉडेलवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक पुढील महिन्याच्या सुरुवातीला होऊ शकते.

नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे अध्यक्ष आणि मंडळाचे सदस्य दीपक जैस्वाल यांनी सामाजिक सुरक्षा निधीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी, अशी सूचना केली आहे. तसेच कंपन्यांनी या निधीसाठी द्याव्या लागणाऱ्या योगदानाचा आर्थिक भार कामगारांवर टाकू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

कंपन्यांच्या योगदानामुळे कामगारांच्या प्रोत्साहन रकमेत किंवा प्रत्येक ऑर्डरसाठी मिळणाऱ्या मोबदल्यात कपात होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे जैस्वाल यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आगामी बैठकीत निधी उभारणीची पद्धत आणि योजनांचे स्वरूप याबाबत काय निर्णय होतो, याकडे गिग वर्कर्सचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी सर्वात मोठी खुशखबर! डिसेंबरअखेर केंद्र सरकार करणार मोठी घोषणा; पेन्शन अन् आरोग्य विम्याचा थेट लाभ!

Friday, 27 November 2026, 22:57

२०२७ च्या बजेटमध्ये कोणाची पगारवाढ होणार? पगार थेट ४२ हजार रुपये अन् ग्रॅच्युइटी मर्यादा ४० लाख ? अर्थमंत्र्यांसमोर मांडला मोठा प्रस्ताव

Friday, 27 November 2026, 22:14

पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका; ‘या’ तारखेपासून खुला होणार भुयारी मार्ग

Friday, 27 November 2026, 21:42

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांची भूमिका काय? ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर येताच जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा!

Friday, 27 November 2026, 20:43

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

Friday, 27 November 2026, 19:54

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Friday, 27 November 2026, 19:03
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp