पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्न देखील केले जातात. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत समुपदेशक या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 24 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : समुपदेशक
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी (M.S.W) आणि पदव्युत्तर पदवी (M.A. मानसशास्त्र) + दोन वर्षांचा अनुभव.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : नागपूर विभागीय नियंत्रक, विभागीय कार्यालय, रा. प. नागपूर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.msrtc.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.