पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे वरिष्ठ हवामान वित्त विशेषज्ञ आणि मुख्य वित्तीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी पदव्युत्तर पदवी, सी.ए. असणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, सदर नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 सुरु झाली आहे. त्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nabard.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.