पुणे : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था अर्थात ESIC विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कारण, या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
ESIC विभागात विमा वैद्यकीय व्यवसायी या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे. यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विमा वैद्यकीय व्यवसायी.
– नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
– वयोमर्यादा : 67 वर्षांपेक्षा कमी असावे
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. वैद्यकीय प्रशासन अधिकारी रा.का.वि. सोसायटी, यांचे कार्यालय, आर. एच-३३ गोरख वाघ चौक, मनाली स्क्वेअर, पहिला मजला, बजाज नगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर-४३११३६.