पुणे : बँकेत नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’, मुंबई येथे भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’, मुंबई येथे सल्लागार (निवृत्त अधिकारी) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी 15 मे पासून अर्ज करता येणार असून, 31 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सल्लागार (निवृत्त अधिकारी).
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु.45,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 मे 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, HCM विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई 400021.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.centralbankofindia.co.in/ वरून माहिती घेता येणार आहे.