पुणे : तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात आहात काय? असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आता पुण्यातील भारती विद्यापीठात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. लेखा व लेखापरीक्षण विभाग या पदांवर ही भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://bvp.bharatividyapeeth.edu/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लेखा व लेखापरीक्षण विभाग.
– शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024.