पुणे : अकोला महानगरपालिकेत काही पदांवर नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 14 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अकोला महानगरपालिका येथे मुख्य संचालन व्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अकोला येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्य संचालन व्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अकोला.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2025
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य आवक-जावक कक्ष, अकोला महानगरपालिका, अकोला.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://amcakola.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.