पुणे : तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांसह इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 271 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर.
– एकूण रिक्त पदे : 271 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : बारावी पास, MBBS, BAMS, GNM/BSc नर्सिंग, ग्रॅज्युएशन / मास्टर्स / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा.
– वेतन / मानधन : दरमहा 18,000 ते 60,000 रुपये (पोस्टनुसार).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मार्च 2024.
– या भरती प्रक्रिेयेबाबत अधिक माहितीसाठी http://www.punecorporation.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.