पुणे : पुण्याच्या दूरसंचार विभागात लवकरच भरती होणार असून, यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अभियंता या पदासाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचे आहेत.
या जागांसाठी होणार भरती :
उपविभागीय अभियंता
एकूण जागा – 270
ही कागदपत्रे आवश्यक :
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
केंद्र किंवा राज्याच्या कायद्याद्वारे अंतर्भूत केलेल्या विद्यापीठातून “इलेक्ट्रिकल” किंवा “इलेक्ट्रॉनिक्स” किंवा ‘इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन’ किंवा ‘कॉम्प्युटर सायन्स’ किंवा “टेलिकम्युनिकेशन्स’ किंवा ‘माहिती तंत्रज्ञान’ किंवा ‘इंस्ट्रुमेंटेशन’ मधील अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक.
इतका मिळणार पगार :
उपविभागीय अभियंता – १,५१,१००/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठी पत्ता :
ADG-1(A & HR), DGT HQ, रूम नंबर 212, 2रा मजला, UIDAII इमारत, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली -110001
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dot.gov.in/ या लिंकवर क्लिक करा