पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारच्या एका विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे फार्मासिस्ट, विशेष शिक्षण शिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी आता मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-411 003, विशेष शिक्षण शिक्षक : स्वाभिमान केंद्र, डॉ बी. ए. कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-411 003 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : फार्मासिस्ट, विशेष शिक्षण शिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 28 सप्टेंबर 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://kirkee.cantt.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.