पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 45,290/- ते रु. 52,240/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 60 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 30 मार्च 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : shorerecruitment@sci.co.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.shipindia.com/ वर जाऊन माहिती घ्यावी लागणार आहे.