पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता मुरगाव पोर्ट प्राधिकरण येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दोन लाखांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण येथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. प्रशिक्षणार्थी पायलट, डी.वाय. सचिव, लेखाधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक साहित्य व्यवस्थापक, कायदा अधिकारी, सहायक खर्च लेखाधिकारी आणि सहायक अभियंता या पदांवर ही भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गोवा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 13 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. उमेदवाराला दरमहा 40,000 ते 2,00,000 पर्यंत पगार मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 30-40 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे. 22 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण, हेडलँड, सडा, गोवा – ४०३८०४ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mptgoa.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.