पुणे : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आता शोध संपण्याची शक्यता आहे. मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्र येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे नर्स या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 14 रिक्त पदे भरली जाणार आहेत. नर्स या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. त्यासाठी परिषद कक्ष क्रमांक II Gr. मजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई ४०० ०९४ येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : नर्स.
– एकूण रिक्त पदे : 14 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण आणि नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा किंवा बी. एससी.नर्सिंग किंवा नर्सिंग मध्ये “ए” प्रमाणपत्र.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 24,234/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 27 सप्टेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : परिषद कक्ष क्रमांक II Gr. मजला, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई ४०० ०९४.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.barc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.