तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर येथे महिला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्मिती या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण चार रिक्त पदे भरली जाणार आहेत.
यातील अनेक पदांसाठी MBBS, BAMS, ANM/ GNM/ B.Sc नर्सिंग, 12 वी + DMLT कोर्स, D.Pharm / B.Pharm या शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 18,000 ते 60,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर येथे उमेदवारांना आपला अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://zpsolapur.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.