पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे नर्सिंग सर्व्हिस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एका रिक्त पदावर भरती केली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : नर्सिंग सर्व्हिस
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– शैक्षणिक पात्रता : एएनएम.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठण्याचा पत्ता : स्विकृती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि. नाशिक.