पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे रिक्त पदावर भरती करण्यात येत आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पद : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा 60,000/- रुपये.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 19 मार्च 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि. नाशिक.