पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबई विद्यापीठात विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
मुंबई विद्यापीठात पदोन्नती समुपदेशक, ज्युनियर सिस्टम अधिकारी आणि शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पदोन्नती समुपदेशक, ज्युनियर सिस्टम अधिकारी आणि शिपाई.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, एम.बी.ए, B.Sc.IT, बी.सी.ए.
– वेतन / मानधन : दरमहा 10,800 ते 43,200 रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 21-45 वर्षे (पोस्टनुसार).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई – 400 098.