MPSC News शिरूर : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई हे गाव नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणारे गाव आहे. त्यामुळे शहराकडे व्यवसाय व नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. (MPSC News) मात्र विद्या विकास मंडळाचे विद्याधाम माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी दुष्काळी गावाचे नाव पुसण्याचे ठरविले आहे. (MPSC News) त्यामुळेच पोलिस भरतीत १४ युवकांनी मारलेली बाजी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत अक्षय धनंजय थोपटे, ऋषिकेश बाळासाहेब लांघे, विक्रांत अशोक तळोले व अमित रामदास तळोले या चार युवकांनी पोलीस उनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. (MPSC News)
दुष्काळी कान्हूर मेसाई बनतेय अधिकाऱ्यांच गाव
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई हे शिरूर राजगूरूनगर या रस्त्यावरील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. प्रत्येक वर्षी दुष्काळात येथे टॅंकर ने पाणी पुरवावे लागते. दुष्काळी गावामुळे या ठिकाणी कोणताही वधूपिता मुलगी देण्यास तयार होत नाही. पण या ठिकाणच्या तरूणाईत जिद्दपणा असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच पाणी दार बनविण्यासाठी येथील तरूणाई पुढाकार घेताना दिसत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या वाढवून पाणी आडवा पाणि जिरवा याला महत्व देण्यात आले आहे. जिद्दीची लढाई आता येथील विद्यार्थ्यांमध्ये पहावयास मिळत आहे.
विद्या विकास मंडळाचे विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून चालविले जाते. त्यातून विद्यालयात वेगवेगळ्या सुवीधा पुरविण्यात आल्या आहेत. ग्रामस्थ व अधिकाऱ्यांच्या मदतीने येथे स्पर्धा परिक्षा वर्ग सुरू करण्यात आला आहे पुर्ण वेळ सुरू असलेला हा वर्ग विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षी च्या पोलिस भरतीमध्ये चौदा विद्यार्थी पोलीस दलात सामिल झाले आहे. जिद्दी तरूण, चिकाटीने अभ्यास करून त्यांना प्राचार्य अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन मिळू लागले आहे. पोलिस भरतीत मिळालेले मोठे यश येथील ग्रामस्थांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चार युवकांनी बाजी मारली आहे.
अक्षय धनंजय थोपटे ह्या युवकाने तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले आहे. ऋषिकेश बाळासाहेब लांघे युवकाने वाणिज्य शाखेची पदवी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथून घेऊन २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत यश संपादित केले आहे. विक्रांत अशोक तळोले याने देखील बी.एस्सी पदवी संपादन करुन २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत यश संपादित केले आहे.
तर अमित रामदास तळोले याच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पूर्व परीक्षेच्या पेपरच्या दोन दिवस आधीच वडिलांचे निधन झाले. वडील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये असताना बाकावर बसून रात्र रात्र अभ्यास केला. वडिलांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी पेपर देऊन यश संपादित केले. पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे समजताच अमितने वडिलांच्या आठवणीने अश्रुंना मोकळी वाट करून दिली.
आता दुष्काळी भागात असलेल्या या गावची ओळख नव्याने अधिकाऱ्यांचे गाव म्हणून होऊ लागली असल्याचे अमित ने यावेळी सांगितले. आम्ही सारे जण विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकलो. शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे बीज मनात रुजले असून खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण होताना खूप आनंद होतोय. असे लांघे यांनी सांगितले. दुष्काळी भागातील तरुणांनी आता स्पर्धा परीक्षांचा राजमार्ग स्वीकारला पाहिजे असे मत नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक अक्षय थोपटे याने व्यक्त केले .
दरम्यान, दुष्काळी गाव म्हणून कान्हूर मेसाई ची ख्याती आहे. त्यासाठी युवकांनी परिस्थीतची जाणीव ठेवून जिद्दीने परिस्थितीचा सामना केला पाहिजे. अधिकरी झाल्यावर गावाच गावपण विसरून जाऊ नये. आपल्या बुद्दीमत्तेच्या जोरावर गावच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना गावापर्यंत आणल्या पाहिजे. त्यातून दु्ष्काळी गावाच्या झळा पुसण्याच काम या अधिकारी वर्गांनी केले पाहिजे. असे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले. गावाच्या या यशामुळे या चार ही अधिकाऱ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.