mpsc exam : पुणे : शासकीय सेवेत काम करण हे अनेक तरुणांचे स्पप्न असते. आता हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) रखडलेल्या भरती घेण्याचे ठरवले आहे. एसपीएससीमध्ये हजारो पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल २१ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. डिसेंबर महिन्यांत त्यासाठीच्या अनेक पदांच्या जाहिराती निघणार आहेत. आठ महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमपीएससी आयोगाने दिली.
वैद्यकीय शिक्षण विभागात भरती
एमपीएससी भरतीत सर्वाधिक पदे वैद्यकीय शिक्षण विभागात भरली जाणार आहे. तब्बल २ हजार पदे भरली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांत ६० हजार पदे निवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. तसेच आधीपासूनची पदे धरली तर हा बॅकलॉग दोन लाखांवर गेला आहे. सामान्य प्रशासन विभागात १९००, वित्त विभागात १६०० गृह विभागात ११८४ तर सार्वजनिक आरोग्य विभागात ६७०७ पदे भरली जातील. एमपीएससीकडून आठ महिन्यांत ही भरती पूर्ण होईल.
गेल्या वर्षभरात अ, ब आणि अराजपत्रिक ब गटासह लिपिक पदांच्या भरतीसाठी तब्बल २१ हजार जागांची विविध विभागांकडून मागणी झाली. या पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे. गेल्या पाच वर्षांत २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ९ हजार २०७ पदे भरली गेली होती. सर्वात कमी पदे २०१९-२० मध्ये भरली गेली. त्या वर्षांत ३ हजार ३६६ पदे भरली गेली. मागील दोन वर्षांत आठ हजार पदांची भरती झाली. २०२१ मध्ये ३,३९१ तर २०२२ मध्ये ४,५५७ पदे भरली गेली.
कोणत्या वर्षात किती पदे भरली
२०२१-२२ मध्ये ४,५५७ पदे भरली गेली.
२०२०-२१ मध्ये ३,३९१ पदे भरली गेली.
२०१९-२० मध्ये ३,३६६ पदे भरली गेली.
२०१८-१९ मध्ये ५,७९२ पदे भरली गेली.
२०१७-१८ मध्ये ९,२०७ पदे भरली गेली.
२०१६-१७ मध्ये ४,३३३ पदे भरली गेली.
२०१५-१६ मध्ये ६७०७ पदे भरली गेली.