पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022) पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वनक्षेत्रपाल, कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, स्थापत्य सहायक अभियंता, विद्युत यांत्रिकी सहायक अभियंता आदी पदे या परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत.
पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये केला जाईल. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालात समाविष्ट केली जातील, असे एमपीएससीने स्पष्ट केले.
या पदांसाठी निश्चित केलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
जाहिरात क्र.: 087/2022
पदाचे नाव – वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता
पद संख्या – 378 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
अर्ज शुल्क –
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग – रु. 294/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 ऑक्टोबर 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in