मुंबई : राज्यात तब्बल ७८००० पदांची मेगा भरती लवकरच सुरु होणार आहे. पोलीस दलातील ७ हजार पदांच्या भरती प्रक्रियेने याचा शुभारंभ होणार आहे. पोलीस भारती प्रक्रियेची सुरवात १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अशी मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे.
सामान्य प्रशासन विभागाची काल मुंबईत बैठक झाली. त्याबैठकीत राज्य सरकारने वरील निर्णय घेतला आहे. गृहविभागातील पोलीस पदभरती – ७२३१, एमपीएससीमार्फत भरती ११,०२६, गट ‘ब, क आणि ड’श्रेणीची पदभरती ६०,००० होणार आहे. तर डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास या विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमधील रिक्तपदांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो.