पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई येथे मेगा भरती निघाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यामध्ये 1067 पदांवर भरती केली जाणार आहे.
‘एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस’ येथे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर, ड्युटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर-पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्व्हिसेस, रॅम्प मॅनेजर, डेप्युटी रॅम्प मॅनेजर, ड्युटी मॅनेजर-रॅम्प यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात दहावी उत्तीर्णसह आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, बी. एससी., एमबीए, बी.ई यांसारखे शिक्षण गरजेचे आहे. ही पात्रता असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल, उप. टर्मिनल मॅनेजर-कार्गो, ड्युटी मॅनेजर -कार्गो, ड्युटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर ऑफिसर-कार्गो, पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
– एकूण रिक्त पदे : 1,067 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, बी. एससी., एमबीए, बी.ई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 24,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 22, 23, 24, 25 आणि 26 ऑक्टोबर 2024.
– मुलाखतीची पत्ता : GSD कॉम्प्लेक्स, सहारा पोलिस स्टेशनजवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई 400099.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.aiasl.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.