पुणे : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात मेगा भरती केली जाणार आहे. त्यानुसार, संबंधित विभागाकडून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यातील विशेष बाब म्हणजे घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
राज्याच्या महिला व बाल विकास विभागात संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 236 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड..
– एकूण रिक्त पदे : 236 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.