पुणे : सरकारी नोकरीच्या प्रयत्नात अनेकजण असतात. त्यात तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC मध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग येथे उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ आणि केबिन सुरक्षा निरीक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 82 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ आणि केबिन सुरक्षा निरीक्षक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 5 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
यासाठी बारावी उत्तीर्ण, पुरातत्व किंवा भारतीय इतिहास किंवा भूगर्भशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी, पुरातत्वशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा प्रगत डिप्लोमा असणे गरजेचे आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://upsc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.