पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ठाणे महानगरपालिकेत अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय कार्यकर्ता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 36 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय कार्यकर्ता या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 18,000 ते 60,000 पर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे – 400602 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://thanecity.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.