पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ठाणे महापालिकेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेत अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची 22 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 35 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 75,000/- ते रु. 1,50,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in-Interview)
– मुलाखतीची तारीख : 22 डिसेंबर 2023.
– मुलाखतीचा पत्ता : अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
– या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी https://thanecity.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.