पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर आता तुमचा हा शोध संपण्याची शक्यता आहे. कारण, पुणे येथील समाज कल्याण विभागात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे येथे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत एकूण 219 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक.
– एकूण रिक्त पदे : 219 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : एसएससी, पदवी उत्तीर्ण.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,500/- ते रु. 1,42,400/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18-38 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024.