पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता भारतीय नौसेनेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
भारतीय नौसेनेत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नागरी (गट-ब आणि क) या पदासाठी ही भरती सुरु होणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 741 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही पात्रता परीक्षा, मुलाखत यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये 20 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर 2 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : नागरी (गट-ब आणि क).
– एकूण रिक्त पदे : 741 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024.